
नाशिकमध्ये शुक्रवारी एक भीषण रस्ता अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका वेगवान कारने दुभाजक तोडून दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या दोन वाहनांना धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारचा टायर फुटल्याने अपघात
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील एका नामांकित कॉलेजचे 8 ते 9 विद्यार्थी स्विफ्ट कारमधून मित्राच्या लग्नाला गेले होते. सायंकाळी नाशिकला परतत असताना मोहदरी घाटातील गणपती मंदिराजवळ त्यांच्या गाडीचा टायर अचानक फुटला. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार सरळ दुभाजकावर पलटी होऊन सिन्नरच्या दिशेने येणाऱ्या इनोव्हा व स्विफ्ट कारला धडकली. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्युमुखी पडलेले सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी होते.