
नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक-शिर्डी महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मुंबईला लागून असलेल्या उल्हासनगरातील अनेक भाविक शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी बाहेर पडले होते. हे सर्व लोक लक्झरी बसमधून दर्शनासाठी जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बसमध्ये 50 प्रवासी होते.
सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथेर गावाजवळ बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी जोरदार होती की बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
10 Pilgrims killed as Luxury Bus rams into bus on #Nashik Sinnar Highway. Passenger were going to #Shirdi. 40 others injured. pic.twitter.com/7OuTbcQ4ii
— Manoj Khandekar (@manojkhandekar) January 13, 2023
जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. मुंबईला लागून असलेल्या अंबरनाथ, ठाणे आणि उल्हासनगर येथील हे सर्व साईभक्त शिर्डीच्या दिशेने जात होते. त्यानंतर अचानक हा अपघात झाला.
नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. यासोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्याचबरोबर सर्व जखमींना शासकीय खर्चाने योग्य उपचार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अपघाताचे वृत्त समोर येताच मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून संपूर्ण माहिती घेतली.