रत्नागिरी-दापोलीतील भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे रोडवर रविवारी (25 जून) सायंकाळी भीषण रस्ता अपघात झाला. या अपघातात वडील-लेकीसह आठ जणांचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले. या अपघातामुळे दापोली आणि हर्णे पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. अपघातानंतर ट्रेलर चालक जंगलातून पळून गेला.

अपघाताची माहिती मिळताच दापोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघात झालेल्या ठिकाणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांची गर्दी झाली होती. जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहींना प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.