राजस्थानमध्ये भीषण अपघात, 7 जण जिवंत जाळले, थरकाप उडवणारा व्हिडिओ पहा

WhatsApp Group

राजस्थानच्या सीकर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. फतेहपूर येथील चुरू-सालासर महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली, त्यामुळे दोन्ही वाहनांनी पेट घेतला. या अपघातात कारमध्ये प्रवास करणारे 7 जण जिवंत जळाले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा एक व्हिडिओही समोर आला आहे.

फतेहपूरच्या शेखावटीमध्ये ही घटना घडली आहे. समोरून जाणाऱ्या ट्रकला कार धडकली. ट्रक कापसाने भरला होता. धडक होताच कार आणि ट्रकला भीषण आग लागली, त्यामुळे कारमध्ये बसलेल्या लोकांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि ते जिवंत जळून खाक झाले. माहिती मिळताच फतेहपूर, रामगड आणि लक्ष्मणगढ येथील अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि अर्ध्या तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. कारला यूपी राज्याचा नंबर प्लेट आहे.

मृत मेरठचे रहिवासी होते.

आग विझवल्यानंतर जिवंत जळालेल्या लोकांना गाडीतून बाहेर काढण्यात आले. मृत हे मेरठचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सालासर बालाजीचे दर्शन घेऊन ते परत मेरठला जात होते. मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

मृतांची ओळख

नीलम पत्नी मुकेश गोयल, आशुतोष मुलगा मुकेश गोयल, मंजू पत्नी महेश बिंदल, हार्दिक मुलगा महेश बिंदल, स्वाती पत्नी हार्दिक बिंदल, दीक्षा मुलगी हार्दिक बिंदल अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. पोलिसांनी अपघाताची माहिती मृतांच्या कुटुंबीयांना दिली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.