दिल्लीला लागून असलेल्या नोएडातील सेक्टर-20 पोलीस स्टेशन हद्दीतील फिल्मसिटीमध्ये असलेल्या स्टुडिओमध्ये फॅशन शो सुरू असताना एक वेदनादायक दुर्घटना घडली आहे. कार्यक्रमादरम्यान लाइटिंग ट्रस (लोखंडी खांब) पडून मॉडेलचा मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी दीड वाजता फिल्मसिटीच्या एका स्टुडिओमध्ये फॅशन शोचा कार्यक्रम सुरू होता. यादरम्यान अचानक लाइटिंगचा ट्रस पडला आणि मॉडेलिंगसाठी आलेली एक तरुणी आणि तरुण त्यात अडकले. यामुळे मॉडेलचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला.