मध्यप्रदेशात भीषण अपघात, बस-कारच्या धडकेत 11 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

मध्य प्रदेशातील बैतुल येथे आज पहाटे एक भीषण रस्ता अपघात झाला. बैतूल जिल्ह्यातील झाल्लार पोलीस स्टेशन परिसरात समोरून बस आणि कारची समोरासमोर धडक झाली, यात 11 जणांचा मृत्यू झाला. याच्या दोन दिवसांपूर्वी मुरैना जिल्ह्यात मंगळवारी एक वेदनादायक रस्ता अपघात झाला होता. डंपर आणि बोलेरो यांच्यात झालेल्या धडकेत पाच जणांचा मृत्यू झाला.

एसपी सिमला प्रसाद यांनी सांगितले की, झालर पोलिस स्टेशनजवळ बस आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत 11 जणांचा मृत्यू झाला. जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात काम करणारे मजूर सणानिमित्त तवेरा कारने आपल्या घरी परतत होते. बस चालकाच्या म्हणण्यानुसार, तवेरा कारचा चालक चुकीच्या बाजूने भरधाव वेगाने आला आणि गाडीला धडकली. अपघातातील मृतांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जात आहे.