झारखंडच्या गिरिडीहमध्ये भीषण अपघात : प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून 50 फूट खाली कोसळली, 4 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यात रात्री उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. एक बस पुलाचे रेलिंग तोडून 50 फूट खाली नदीत पडली. या अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे की मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गिरिडीहचे पोलीस अधिकारी अनिल कुमार यांनी सांगितले की, हा अपघात गिरिडीह डुमरी रोडवर घडला जिथे बस रांचीहून गिरिडीहला जात असताना बराकर नदीत पडली.

पुलाचे रेलिंग तोडून बस 50 फूट खाली नदीत पडली

अपघातग्रस्त बस रांचीहून गिरिडीहला जात होती. बस गिरिडीह-डुमरी मार्गावर आली असता तिचे नियंत्रण सुटले आणि पुलाचे रेलिंग तोडून 50 फूट नदीत कोसळली. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. बसमध्ये अनेक जण अडकले असून अनेक प्रवासी नदीत बुडाले आहेत.पुलावरुन जाणाऱ्या इतरांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. स्थानिक लोकांनी तातडीने बसमधून लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, जिल्हा प्रशासन आणि पोलीस बचावकार्यात गुंतले आहेत. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, झारखंडच्या गिरिडीहमध्ये रांचीहून गिरिडीहला येणारी बस बराकर नदीत कोसळल्याची दुःखद बातमी मिळाली आहे. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी कामना केली आहे.

Bus Accident In Giridih