राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान हिंगोलीमधून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये एका पोलिस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा या ठिकाणी ही घटना घडली आहे. नीकळकंठ दंडगे असं पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. या भीषण अपघातात दंडगे यांच्यासह इतर दोन सहकारी मित्र देखील जखमी झाले आहेत.