ग्रीसमध्ये भीषण अपघात: समोरासमोर येणाऱ्या गाड्यांमध्ये जोरदार धडक, 26 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

ग्रीसमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 85 जण जखमी झाले. दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही. ट्रेन अथेन्सहून उत्तरेकडील थेसालोनिकी शहराकडे जात होती. लॅरिसाजवळ ही घटना घडली. याला खुद्द तेथील राज्यपालांनी दुजोरा दिला आहे.

ग्रीसमध्ये मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला, तर 85 जण जखमी झाले. दोन गाड्यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. आतापर्यंत अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.

अपघातग्रस्त डब्यांना आग
एका टीव्ही चॅनलला दिलेल्या निवेदनात गव्हर्नर कॉन्स्टँटिनोस अगोरासाटोस म्हणाले – ही टक्कर खूपच धोकादायक होती. सुरुवातीला चार डबे रुळावरून घसरले. नंतर आग लागली. सर्व पूर्णपणे नष्ट झाले.

250 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले

अपघातातील सुमारे 250 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींवर विश्वास ठेवायचा झाल्यास, अपघातानंतर ट्रेनमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. लोक ओरडत होते. त्याचवेळी दुसऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, हा अपघात म्हणजे भूकंप झाल्यासारखे वाटले. घटनास्थळी बचाव पथक तैनात आहे. अपघातानंतर प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात येत आहे.