प्रसिद्ध अभिनेत्रीच्या गाडीला भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; व्हिडिओ आला समोर

0
WhatsApp Group

शाहरुख खान आणि आशुतोष गोवारीकर यांच्या ‘स्वदेस’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी गायत्री जोशी इटलीमध्ये अपघाताची शिकार झाली आहे. अभिनेत्री पती विकास ओबेरॉयसोबत प्रवास करत होती. दरम्यान, त्यांची लॅम्बोर्गिनी कार ओव्हरटेक करताना फेरारीला धडकली. दोन्ही गाड्या एकाच वेळी कॅम्पर व्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यानंतर हा अपघात झाला. या अपघातात गायत्री आणि विकास सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे. पण फेरारीवर स्वार असलेल्या जोडप्याचा मृत्यू झाला. मेलिसा क्रॉटली (63) आणि मार्कस क्रॉटली (67) यांना त्यांच्या फेरारी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने जीव गमवावा लागला.

2004 नंतर बॉलिवूडपासून दूर

सार्डिनियामध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर फेरारी कारमध्ये बसलेले दाम्पत्य जागीच ठार झाले. पती-पत्नी मूळचे स्वित्झर्लंडचे होते. गायत्रीने अपघातानंतर सांगितले की, ती तिच्या पतीसोबत इटलीला जात होती. मात्र ते सुखरूप बचावले आहेत. त्यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.

गायत्री जोशीच्या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल

गायत्री जोशी आणि त्यांचे पती विकास ओबेरॉय यांच्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मागील बाजूने गाडी चालवणाऱ्या कारच्या कॅमेऱ्यात संपूर्ण व्हिडिओ कैद झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकामागून एक कार पुढे जात असून समोरून एक पांढऱ्या रंगाचा मिनी ट्रकही जात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर कार मिनी ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते आणि दोघांमध्ये जोरदार टक्कर होऊन मिनी ट्रक पलटी होऊन 1 फेरारीला आग लागली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सध्या अपघाताचा तपास सुरू आहे.

स्वदेश चित्रपटानंतर गायत्री बॉलिवूडपासून दूर आहे. ती आता फक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तिने तिच्या चित्रपटातील भूमिकेनंतर 2004 मध्ये ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय यांच्याशी लग्न केले. ओबेरॉय कन्स्ट्रक्शन ही भारतातील सर्वात मोठी रिअल इस्टेट कंपनी मानली जाते.

गायत्री जोशी यांनी 1999 मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेतून आपल्या करिअरची सुरुवात केली. गायत्रीने 2000 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता. तिला जपानमधील मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.