भीषण अपघात, बस उलटून 18 जणांचा मृत्यू

0
WhatsApp Group

मेक्सिकोमधील ओक्साका येथे बस अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले बहुतांश लोक हे स्थलांतरित असून ते व्हेनेझुएला आणि हैती येथील आहेत.

ओक्साका राज्याच्या ऍटर्नी जनरलने सांगितले की या अपघातात सुमारे 27 लोक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे कारण सध्या समजू शकलेले नाही. अधिकारी या अपघाताचा तपास करत आहेत.

स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता हा भीषण अपघात झाला. याआधी रविवारीही मेक्सिकोमध्ये मोठी दुर्घटना घडली होती. दक्षिण मेक्सिकोमध्ये ट्रक उलटून 10 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. हा अपघात मेक्सिकोच्या चियापास राज्यात घडला.

एका रिपोर्टनुसार, नॅशनल मायग्रेन इन्स्टिट्यूटने अपघातानंतर एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात म्हटले आहे की, चायापासमधील पिझिजियापन-टोनला महामार्गावर अपघात झालेला ट्रक गुप्तपणे २७ क्युबन नागरिकांना घेऊन जात होता. ट्रकचा वेग जास्त असल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या अपघातात एक अल्पवयीन आणि 10 महिलांचा मृत्यू झाला आहे.