
पश्चिम मेदिनीपूरच्या खरगपूर प्लॅटफॉर्मवर बुधवारी दुपारी भीषण अपघात झाला. प्लॅटफॉर्मच्या फूटब्रिजजवळ उभा असलेला रेल्वे तिकीट तपासनीस (रेल्वे टीसी) त्याच्या सहकाऱ्याशी बोलत असताना त्याच्या डोक्यावर हाय व्होल्टेजची विद्युत तार पडली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. टोपी घातलेल्या व्यक्तीवर थेट वायर पडली तेव्हा दोन लोक तिथे उभे राहून बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येते. वायर पडताच टीटी फलाटाखाली रेल्वे रुळावर पडतो. या अपघातात टीटीसोबत बोलत असलेली दुसरी व्यक्ती थोडक्यात बचावली. आजूबाजूच्या लोकांनी टीटीला गंभीर अवस्थेत रेल्वे रुग्णालयात पाठवले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. टीटीची प्रकृती चिंताजनक आहे.
Disturbing Video, When a Ticket Checker Gets Electrocuted Accidently When Came in Contact With Overhead Wire In A Freak Accident at Kharagpur Railway Station. pic.twitter.com/smaGFgHnRN
— Abir Ghoshal (@abirghoshal) December 8, 2022
खरगपूर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजान सिंग सरदार असे करंटने जखमी झालेल्या रेल्वे टीटीचे नाव आहे. बुधवारी दुपारी खरगपूर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या फूटब्रिजजवळ उभे असलेले दोन तिकीट तपासक आपापसात बोलत होते. दरम्यान, सुजानच्या डोक्यावरील हायव्होल्टेज वायर तुटली. त्यानंतर विजेचा धक्का लागून सुजान सिंह रेल्वे रुळावर पडला.
जखमी अवस्थेत बेशुद्ध असलेल्या सुजानसिंग सरदार यांना वाचवण्यात आले आणि त्यांना खडगपूर रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर आणि शरीराच्या अनेक भागावर जखमेच्या खुणा होत्या. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, समोर उभा असलेला दुसरा तिकीट परीक्षक बचावला. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्काळजीपणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.