मोठी बातमी! स्टीव्ह स्मिथ नव्हे ‘हा’ झाला ऑस्ट्रेलियाचा नवा कर्णधार!

WhatsApp Group

दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स याची ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेतून कमिन्स कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या पाच सदस्यीय निवड समितीसमोर मुलाखत प्रक्रियेनंतर कमिन्स याची नियुक्ती करण्यात आली आहे.


पॅट कमिन्स बनला ऑस्ट्रेलियाचा 47 वा कसोटी कर्णधार

पॅट कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा पूर्णवेळ कसोटी कर्णधार बनणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच, दिग्गज गोलंदाज रिची बेनो यांच्यानंतर कोणत्याही फॉरमॅटमध्ये कांगारू संघाचे नेतृत्व करणारा तो पहिला गोलंदाज असेल. तर माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असलेला कसोटी गोलंदाज कमिन्स म्हणाला, ‘अ‍ॅशेस मालिकेपूर्वी ही भूमिका स्वीकारताना मला सन्मान वाटतो. मला आशा आहे की मी टीम पेनने गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियन संघाला जे नेतृत्व दिले तेच नेतृत्व मी देऊ शकेन.

पॅट कमिन्स पुढे म्हणाला, ‘स्टीव्ह स्मिथआणि माझ्याशिवाय या संघात आणखी अनेक वरिष्ठ खेळाडू आहेत. तसेच, काही उत्तम तरुण प्रतिभा येत आहेत, ज्यामुळे आमचा संघ खूप मजबूत दिसत आहे. “हा एक अनपेक्षित विशेषाधिकार आहे ज्यासाठी मी खूप कृतज्ञ आहे आणि खूप उत्सुक आहे.”

टीम पेनने घेतला ब्रेक घेण्याचा निर्णय!

टीम पेनचे अश्लिल मॅसेज प्रकरण समोर आल्यानंतर पॅट कमिन्सची नियुक्ती करण्यात आली आहे. आता टीम पेनने काही काळ संघातून बाहेर असणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले, आम्ही ओळखतो की टीम आणि त्याच्या कुटुंबासाठी हा खूप कठीण काळ असून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. त्याच्या कुटुंबाच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ब्रेक घेण्याच्या टिमच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.

येत्या काही दिवसांमध्ये 8 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अ‍ॅशेस मालिकेपूर्वी अंतिम संघावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय निवड समितीची बैठक होणार आहे.