ICC Champions Trophy 2025: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर

WhatsApp Group

ICC Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता काही दिवसच शिल्लक आहेत पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडला आहे. टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी ही खूप निराशाजनक बातमी आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.

पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होऊ शकणार नाही. भारतासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. निवड समितीने बुमराहच्या जागी हर्षित राणाला संघात स्थान दिलं आहे. खापतीमुळे बुमराह खेळू शकणार नाही अशी ही दुसरी आयसीसी स्पर्धा असेल. यापूर्वी, पाठीच्या दुखापतीमुळे तो ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२२ च्या टी-२० विश्वचषकालाही मुकला होता.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आठही संघांना त्यांचे अंतिम १५ खेळाडू सादर करण्यासाठी ११ फेब्रुवारी ही अंतिम तारीख निश्चित केली होती. बीसीसीआयने जानेवारीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंड मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यावेळी इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बुमराहचा बॅक-अप म्हणून हर्षित राणाला संघात समाविष्ट करण्यात आले होते. यानंतर, राणाने नागपूरमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एकदिवसीय पदार्पण केले.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी भारताचा १५ सदस्यीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.