Rohit Bal Passed Away : दिवाळीच्या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. देशातील प्रसिद्ध फॅशन डिझायनर रोहित बल यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. रोहित बल यांच्या निधनाची बातमी फॅशन डिझाईन कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात FDCI ने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. ते दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने उद्योगजगतात खळबळ उडाली आहे.
कौन्सिल ऑफ इंडिया म्हणजेच FDCI ने सोशल मीडिया पोस्टद्वारे रोहित बल यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे. वास्तविक, ते दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांनी मधल्या काळात कामातून ब्रेकही घेतला. मात्र, गेल्या वर्षी त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर त्यांनी पुनरागमनही केलं होतं. रोहित बलचा शेवटचा शो लॅक्मे इंडिया फॅशन वीक होता.