IND vs AUS सामन्याचे तिकीट काढण्यासाठी आलेल्या चाहत्यांवर पोलिसांनी केला लाठीचार्ज, हैदराबादमध्ये गोंधळ

WhatsApp Group

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. पहाटे 5 वाजल्यापासूनच चाहते या सामन्याची तिकिटे काढण्यासाठी थांबले होते, मात्र वेळ निघून गेल्याने वाढत्या गर्दीला सांभाळणे पोलिसांना जड झाले. जमाव अनियंत्रित झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या लाठीचार्जमध्ये 4 जण जखमीही झाले आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत ANI ने लिहिले की, ‘हैदराबादच्या तेलंगणा येथील राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या #INDvsAUS सामन्यासाठी तिकीट काढण्यासाठी जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या प्रचंड गर्दीनंतर जिमखाना मैदानावर चेंगराचेंगरी झाली.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात 4 जण जखमी झाले आहेत. या घटनेचे आणखी अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. क्रिकेटप्रेमींसोबतच्या या वागण्याने अनेक चाहतेही निराश झाले.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा