भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवार, 15 जानेवारी रोजी हैदराबाद येथे खेळला गेला. ज्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 12 धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलने किवी संघाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले. त्याचबरोबर तो चर्चेतही आहे. गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते सचिन तेंडुलकरच्या नावाने त्याला चिडवत आहे.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिचे नाव शुभमन गिलसोबत जोडले गेले आहे हे जवळपास सर्वांनाच माहिती आहे. अनेक रिपोर्ट्सनुसार, सारा आणि गिलमध्ये प्रेमसंबंध असल्याचंही म्हटलं जात आहे. मात्र, अद्याप या प्रकरणाला दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, गिलच्या द्विशतकानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चाहते शुभमनला सचिनची काळजी घेण्यास सांगत आहेत. त्यावेळी शुभमन बसमध्ये बसला होता. इथे चाहत्यांचा सचिन म्हणजे सारा. त्यानंतर गिलने लाजून बसची खिडकी बंद केली.
View this post on Instagram
भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुभमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त फलंदाजी करताना दिसला होता. त्याने किवी गोलंदाजांवर ताशेरे ओढले. त्याने या सामन्यात वनडे कारकिर्दीतील तिसरे शतकही झळकावले. मात्र शतकानंतरही त्याचे मन भरले नाही. शतकानंतरही तो चौकार आणि षटकार मारत राहिला. त्यामुळे त्याने आपले द्विशतकही पूर्ण केले. गिलने 139.60 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना 149 चेंडूत 208 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून 19 चौकार आणि 09 गगनचुंबी षटकारही पाहायला मिळाले आहेत.