सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाहत्याची स्टोन आर्टच्या माध्यमातून अँड्र्यू सायमंड्सला श्रद्धांजली, पाहा फोटो

ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा काल कार अपघातात मृत्यू झाला. अँड्र्यू सायमंड्स यांच्या निधनानंतर क्रिकेट विश्वात आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाहत्याने त्यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
कणकवलीमधील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्टच्या माध्यमातून अँड्र्यू सायमंड्सना श्रद्धांजली वाहिली आहे.
नदीत मिळणाऱ्या दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावर रंगाची उधळण करत अँड्र्यू सायमंड्सचं स्टोन आर्ट साकारलं आहे.
चित्रकार सुमन दाभोलकर यांनी याआधीही स्टोन आर्टच्या माध्यमातून अनेक चित्र रेखाटली आहेत.
दगडाला कोणताही आकार न देता, काटछाट न करता दगडावर चित्र साकारण्यात तसेच आव्हानात्मक चित्र साकारण्यात सुमन दाभोलकर यांचा हातखंडा आहे.