सोमवारी रात्री गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमियर लीग IPL 2022 च्या मोसमातील पहिला पराभव स्वीकारावा लागला. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने Sunrisers Hyderabad गुजरात टायटन्सचा Gujarat Titans आठ गडी राखून पराभव केला.
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच फ्रँचायझीचे कर्णधारपद भूषवणाऱ्या हार्दिक पांड्या Hardik Pandya हैदराबादविरुद्धच्या सामन्यादम्यान वरिष्ठ गोलंदाज मोहम्मद शमीला भडकला असल्याचे पाहायला मिळाले. हैदराबादच्या डावाच्या 13व्या षटकात हार्दिकच्या चेंडूवर मोहम्मद शामीने Mohammed Shami राहुल त्रिपाठीचा झेल चुकवला आणि त्यानंतर हार्दिक आपल्या वरिष्ठ गोलंदाजावर ओरडताना दिसला.
Dear Hardik, you are a terrible captain. Stop taking it out on your teammates, particularly someone as senior as Shami. #IPL #IPL2022 #GTvsSRH pic.twitter.com/9yoLpslco7
— Bodhisattva #DalitLivesMatter ????????????️???? (@insenroy) April 11, 2022
हार्दिकच्या याच षटकात हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने दोन षटकार ठोकले, त्यामुळे तो संतापला. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने डीप थर्ड मॅनच्या दिशेने हवेत शॉट खेळला, ज्यावर शामीला झेल पकडता आला नाही. यानंतर हार्दिक रागात दिसला आणि तो शमीवर ओरडू लागला. पांड्याच्या रागाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून क्रिकेट चाहते पांड्याला आपल्या वरिष्ठ गोलंदाजाचा आदर करण्याचा सल्ला देत आहेत.