T20 World Cup: जसप्रीत बुमराह 2022च्या विश्वचषकातून बाहेर पडल्याने चाहते संतप्त, ट्विट करत म्हणाले- निवृत्त घे

Jasprit Bumrah: भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 मधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी सांगितले की, बोर्डाच्या वैद्यकीय पथकाने सखोल तपासणी आणि तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह गेल्या महिन्यात आशिया कपमधून बाहेर पडला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची T20 मालिका खेळण्यासाठी तो संघात परतला, जिथे त्याने दोन सामने खेळले आणि एक विकेट घेतली.
बुमराहचा देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला होता, परंतु पाठीच्या दुखापतीमुळे त्याला पुन्हा वगळण्यात आले आणि तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मध्ये तपासणीसाठी गेला. बुमराहच्या आधी, अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजालाही T20 विश्वचषकातून वगळण्यात आले आहे, जो गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनात आहे.
जसप्रीत बुमराह वर्ल्ड कपमधून बाहेर पडल्याने चाहते प्रचंड संतापले आहेत. आकडेवारी पाहता जसप्रीत बुमराहने या वर्षात भारतासाठी फक्त 5 T20 सामने खेळले आहेत. त्याच वेळी, त्याने आयपीएलमधील एकूण 14 सामन्यांमध्ये ब्रेक न घेता भाग घेतला. त्यामुळे हे खेळाडू कोणत्याही अडचणीशिवाय आयपीएलमध्ये खेळतात, पण भारताच्या सामन्यांमध्ये ते अनफिट होतात, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चाहते नाराज झाले असून ते आता बुमराहला निवृत्तीचा सल्ला देत आहेत.
गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे झालेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची निराशाजनक कामगिरी झाली होती, जिथे संघ सुपर-12 च्या पुढे प्रगती करू शकला नाही. बुमराहने त्या स्पर्धेत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने पाच सामन्यांत १३.५७ च्या सरासरीने सात बळी घेतले. 60 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 70 विकेट्ससह खेळाच्या सर्वात लहान फॉर्मेटमध्ये बुमराह भारताचा तिसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. जडेजानंतर त्याला T20 विश्वचषकातून वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का आहे.
@Jaspritbumrah93 now will get enough time to recover for the IPL. I guess he should retire from international cricket. 😓 #JaspritBumrah #INDvSA #T20WorldCup
— Rohit Pandey (@mniROHIT) October 3, 2022
World cup jeetne ki aas hi tutt gyi Aaj ,miss you our captain #JaspritBumrah
— Jaspreet Singh (@Jaspree03888439) October 3, 2022
Jasprit Bumrah visits a doctor… pic.twitter.com/Bt19JcDjl9
— Dr Gill (@ikpsgill1) October 3, 2022
Jasprit Bumrah one day before the world cup starts pic.twitter.com/GEhkZWCNav
— Savage (@arcomedys) October 1, 2022
ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा