Viral Video: प्रसिद्ध यूट्यूबरची जगातील सर्वात वेगवान प्राण्याशी शर्यत; व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

न्यूयॉर्क: आपल्या अतरंगी आणि धोकादायक स्टंट्ससाठी ओळखला जाणारा अमेरिकन यूट्यूबर ‘आयशोस्पीड’ (IshowSpeed) याने पुन्हा एकदा इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. यावेळी त्याने कोणा माणसाला नाही, तर चक्क जगातील सर्वात वेगवान प्राणी असलेल्या चित्त्याला (Cheetah) शर्यतीसाठी आव्हान दिले. ३ जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचे डोळे विस्फारले आहेत. त्याने या व्हिडिओला “मी चित्त्यासोबत शर्यत लावली!” असे कॅप्शन दिले आहे.

मृत्यूशी गाठ की प्रसिद्धीचा स्टंट?

व्हिडिओमध्ये आयशोस्पीड एका चित्त्याच्या बाजूला धावण्यासाठी सज्ज झालेला दिसत आहे. काउंटडाउन संपताच दोघेही आपल्या पूर्ण ताकदीनिशी धावू लागतात. चित्ता आपल्या नैसर्गिक वेगाने (ताशी सुमारे ११३ किमी) पुढे जातो. आयशोस्पीडने चित्त्याला मागे टाकण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली, पण निसर्गाच्या या महान ॲथलीटला हरवणे त्याला शक्य झाले नाही. विशेष म्हणजे, व्हिडिओच्या सुरुवातीला स्पीडच्या शरीरावर ओरखडे आणि रक्ताचे डाग दिसत आहेत, ज्यामुळे शर्यतीपूर्वी त्याचा चित्त्याशी हिंसक सामना झाला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IShowSpeed (@ishowspeed)

३ कोटींहून अधिक व्ह्यूज अन् नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पोस्ट होताच काही वेळातच तो जगभर व्हायरल झाला. आतापर्यंत ३.५ कोटींहून अधिक लोकांनी हा थरार पाहिला असून २५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. मात्र, कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी गमतीशीर आणि सावध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांच्या मते, चित्ता आपल्या पूर्ण वेगाने धावतच नव्हता, तो फक्त ‘जॉगिंग’ करत होता.

“चित्ता फक्त फिरत होता!”

एका युजरने कमेंट केली की, “माणूस इतक्या वेगाने धावूच शकत नाही, तो चित्ता फक्त आरामात फिरत होता.” दुसऱ्या एकाने विचारले, “भावा, चित्त्याकडून हारल्यावर कसं वाटतंय?” तर तिसऱ्या युजरने आयशोस्पीडच्या या धाडसावर चिंता व्यक्त करत म्हटले की, “प्रसिद्धीसाठी याने यावेळी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत.