प्रसिद्ध युट्युबर बिंदास काव्या बेपत्ता, आईवडिलांनी केले मदतीचे आवाहन

WhatsApp Group

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तरुण-तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशातच औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या शुक्रवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बिंदास काव्या (YouTuber Bindas Kavya) अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.औरंगाबाद शहरात राहणारी प्रसिद्ध युट्यूबर बिंदास काव्या शुक्रवारपासून अचानक बेपत्ता झाली आहे. मित्र-कुटुंबीयांकडे तिची विचारपूस केली असता कुठेही तिचा पत्ता लागला नाही.

बिंदास काव्या कमी वयात youtube वर यशस्वी भरारी घेतली. तिचे लाखो फॉलोअरर्स आहे. शुक्रवारी ती घरी परतली नसल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सर्वत्र शोधाशोध केला. पण तिचा काहीच पत्ता लागला नाही.अखेरीस पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. पण, पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या पालकांकडून करण्यात येत आहे. आपल्या मुलीचा लवकरात लवकर शोध लागावा अशी विनंती तिच्या पालकांनी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.