
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्री वीणा कपूरची तिच्या मुलाने हत्या केली होती. जमिनीच्या वादातून मुलाने आपल्या 74 वर्षीय आईची हत्या केली. आईची हत्या केल्यानंतर 43 वर्षीय आरोपी मुलाने पोलिसांपासून वाचण्यासाठी मृतदेह नदीत फेकून दिला. वीणा कपूरच्या हत्येची बातमी ऐकून चित्रपट अभिनेत्री नीलू कोहलीचेही हृदय हादरले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून या घटनेबद्दल सांगितले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी आरोपी मुलाची ओळख सचिन कपूर म्हणून केली आहे. सचिन त्याची आई वीणा कपूरविरुद्ध कोर्टात खटला लढत असल्याचे सांगण्यात आले. मालमत्तेवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. पोलिसांनी घरचा नोकर लालू कुमार मंडल यालाही अटक केली आहे.सचिन पूर्वी शिक्षक म्हणून काम करायचा पण आजकाल त्याच्याकडे नोकरी नव्हती. जुहूच्या कल्पतरू सोसायटीत चार बेडरूमच्या फ्लॅटमध्ये तो आईसोबत राहत होता. वीणा कपूरला एक मोठा मुलगा देखील आहे जो यूएसए मध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर आहे.
पोलिसांनी सांगितले की, सचिन आणि वीणा जुहू येथे एकत्र राहत होते. अमेरिकेत राहणाऱ्या मोठ्या मुलाने आईला अनेकदा फोन करूनही संपर्क होऊ शकला नाही, तेव्हा त्याने घराची खबर घेण्यासाठी चौकीदाराला पाठवले. चौकीदाराने फ्लॅटवर जाऊन अनेकवेळा दारावरची बेल वाजवली पण त्याला उत्तर मिळाले नाही. यानंतर वीणा यांच्या मोठ्या मुलाला संशय आला आणि त्याने मंगळवारी जुहू पोलीस ठाण्यात आईच्या हरवल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता कॉल डेटावरून सर्व गुपिते उघड झाली.
View this post on Instagram
पोलिसांच्या चौकशीत सचिनने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांचा असा विश्वास आहे की सचिनने सुरुवातीला अपार्टमेंटमध्ये त्याच्या आईला मारहाण केली आणि रागाच्या भरात बेसबॉलच्या बॅटने तिच्या डोक्यावर मारले. यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत आणि नंतर पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आला. या गुन्ह्यात त्याने काही वर्षांपूर्वी कामावर घेतलेल्या आणि कुटुंबासह राहत असलेल्या मंडल या घरकामगाराची मदत घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.