
कलाविश्वातून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. वृद्धपकालानं त्यांचे निधन झाल्याच माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे. त्यांच्या जाण्याने कलाविश्वाचं मोठं नुकसान झालं आहे.
हिंदी, मराठी, चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा जन्म 13 मार्च 1933 साली झाला. चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना चव्हाण यांनी भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांमध्ये गीते गायिली आहेत. पण मराठी सिनेमांमधील लावणी त्यांची खरी ओळख होती.