दूरदर्शनच्या प्रसिद्ध न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन

0
WhatsApp Group

नवी दिल्ली: देशातील दूरदर्शनच्या प्रसिद्ध न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. 3 दशकांहून अधिक काळ दूरदर्शनमध्ये काम करणाऱ्या गीतांजली यांच्या निधनाबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही शोक व्यक्त केला आहे. अय्यर यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरही त्यांचे चाहते त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरील पहिल्या आणि सर्वोत्कृष्ट इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक असलेल्या गीतांजली अय्यर यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले, असे क्रीडा मंत्री म्हणाले. पत्रकारिता आणि प्रसारण उद्योगात त्यांनी अमिट छाप सोडत प्रत्येक बातमीत विश्वासार्हता, व्यावसायिकता आणि एक वेगळा आवाज आणला.

गीतांजली अय्यर यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला. त्या देशातील पहिल्या इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक होत्या.

अय्यर 1971 मध्ये दूरदर्शनवर रुजू झाले आणि चॅनलसोबतच्या कारकिर्दीत त्यांना 4 वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये त्यांना उत्कृष्ट महिलांच्या सन्मानार्थ दिला जाणारा इंदिरा गांधी ‘प्रियदर्शिनी’ पुरस्कारही मिळाला.