29 बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम करणाऱ्या ‘कॉलरवाली’ वाघिणीचा मृत्यू

WhatsApp Group

मध्य प्रदेशातील सिवनी या जिल्ह्यात पेंच व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीने अखेरचा श्वास घेतला आहे. या वाघिणीचं वय 16-17 वर्ष होतं. सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा विक्रम कॉलरवाली वाघिणीच्या नावावर होता.

2019 मध्ये या वाघिणीने 29 बछड्यांना जन्म दिला आहे. वाघिणीचा जन्म 2005 मध्ये झाला होता. मध्य प्रदेश राज्याला वाघांच राज्य म्हणून ओळख देण्यात कॉलरवाली वाघिणीचा मोठा हातभार आहे.नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या वाघिणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.


पेंचची राणी म्हणूनही तिची ओळख होती. गेल्या काही आठवड्यापासून ही वाघिणीने आजारी होती. या वाघिणीला कोणताही आजार नव्हता. शनिवारी तिने शेवटचा श्वास घेतला.

2005 मध्ये या वाघिणीचा जन्म पेंच नॅशनल पार्कमध्ये साली झाला होता आणि 2008 मध्ये तिने पहिल्यांदा बछड्यांना जन्म दिला होता. 2008 ते 2021 पर्यंत वाघिणीने 8 वेळा आई बनून एकूण 29 बछड्यांना जन्म दिला.


या वाघिणीचा मृत्यूमुळे वन्यजीवप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या वाघिणीला श्रद्धांजली वाहिली आहे. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आहे.