
बॉलिवूडमध्ये हिंदी सिनेमात बोल्ड अभिनय करुन लाखो चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे (Sunny leone) सनी लिओनी. सनी तिच्या सेक्सी अदांमुळे (Bollywood) बॉलिवूड मध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावरही (social media) सनी सक्रिय राहून फोटो-व्हिडिओ शेयर करत असते. पण, समाजातील काही घटकांनी सनीला अजूनही स्विकारले नाहिये. सनी बद्दल काही लोक भेदभाव करत असल्याचेही तिने एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं. आता असंच काहिसं पुन्हा एकदा सनीच्या आयुष्यामध्ये घडलं आहे. सनीने तिच्यासोबत जे घडलं, ते सांगताना दु:ख व्यक्त केले आहे.
सनी लियोनीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. इन्स्टाग्रामवर जवळपास ५२.४ मिलियन लोकं सनीला फॉलो करत आहेत. परंतु जेव्हा ब्रॅंड्सबद्दल बोललं जातं तेव्हा परिस्थिती उलट होते. मोठ्या ब्रॅंड्सकडून सनीला कशाप्रकारे नकार दिला जातो. तिला ब्रॅंडसाठी काम करण्याची मान्यता दिली जात नाही. याबाबत नुकतचं सनीने खुलासा करत म्हटलं की, भारतात असा मेकअप ब्रॅंड नाही आहे, जो मला त्यांच्या सिनेमामध्ये सामील करेल, मला याचं दु:ख वाटतं. आपल्याला वाटतं की, आपणही त्यांच्यासारखे चांगले आहोत. पण तसे नाही आहे. एका कपड्याचा ब्रॅंड जो तुम्हाला एखाद्या इव्हेंटसाठी कपडे देत नाही. कारण तु्म्ही त्यांच्यासाठी मोठं ब्रॅंड नसता. त्यावेळी तुम्ही काय करणार ? त्यामुळेच मी स्वत:ची मेकअप लाईन, कपड्याचं ब्रॅंड बनवलं.
सनी लिओनीने दु:ख व्यक्त करत पुढे म्हटलं की, कंपन्यांनी ब्रॅंडबाबत घेतलेली भूमिका तुमच्या स्वाभिमान दुखावत नाही का ? लोकांना वाटते की, सिनेमाला साईन करणं म्हणजे फक्त एक होकार देणं होय. पण तसं नाहिये. तुम्ही खूप साऱ्या गोष्टींना होकार देऊ शकता, जे सिनेमाच्या सेटवर पोहचण्यापू्र्वीच तुम्हाला कळतं. मग ते मेकअप असो, कपडे, तुमचा कॉन्ट्रॅक्ट किंवा स्टायलिस्ट, तुम्ही सर्वांनाचा होकार देता. माझ्यासाठी तर हे असेच आहे. अशा खूप काही गोष्टी सुद्धा आहेत ज्यांना आपण नकार देत असतो. जर तुम्ही काही विकायचा प्रयत्न करता आणि ते लोकं तुम्हाला नकार देतात, तेव्हा तुम्हाला नक्कीच दु:ख होतं. परंतु, खूपवेळा मला काही प्रोजेक्ट्साठी रिजेक्ट केले आहे, ज्यामध्ये मला सहभाग घ्यायचा होता.