चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध अभिनेत्रीचे स्तनाच्या कर्करोगामुळे निधन

WhatsApp Group

Shannen Doherty Passed Away: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर आली आहे. या अभिनेत्रीचा स्तनाच्या कर्करोगाने मृत्यू झाला आहे. ही बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आणि सर्वत्र शोककळा पसरली. अभिनेत्री तिच्या कॅन्सरच्या आजारामुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. या वाईट बातमीने मनोरंजन क्षेत्र हादरले आहे.

बेव्हरली हिल्स, 90210 फेम अभिनेत्री शॅनन डोहर्टी, जी अनेक वर्षांपासून कर्करोगाने ग्रस्त होती, ती आता आपल्यात नाही. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ही अभिनेत्री केवळ टीव्ही इंडस्ट्रीतच प्रसिद्ध नव्हती तर तिने फिल्मी दुनियेतही खूप यश मिळवले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला.

कुटुंबाने गोपनीयतेची मागणी केली
जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करणाऱ्या या अभिनेत्रीचे निधन झाले असून या वृत्ताला आजच दुजोरा मिळाला आहे. आता या दुःखद काळात अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनी गोपनीयतेची मागणी केली आहे.