प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका राजपूतने केली आत्महत्या, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

0
WhatsApp Group

Mallika Rajput Death: यूपीच्या सुलतानपूर येथील स्थानिक गायिका व अभिनेत्री मल्लिका राजपूतने आत्महत्या केली आहे. विजय लक्ष्मी उर्फ ​​मल्लिका राजपूत या विवाहित महिलेचा कोतवाली नगरच्या सीताकुंड परिसरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी मल्लिकाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. आई सुमित्रा सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मुलगी मुंबईत राहत होती. ती एक युट्युबर देखील होती. चार-पाच वर्षांपूर्वी मुंबईतच प्रदीप शिंदे जनार्दनसह तिचा विवाह झाला होता. प्रथमदर्शनी, वैवाहिक जीवनात थोडे मतभेद असलेलं प्रकरण आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मल्लिकाने तिच्या सुलतानपूरच्या घरात आत्महत्या केली. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त असून अनेक प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. विशेष म्हणजे मल्लिका तिच्या ‘रिव्हॉल्वर रानी’ या चित्रपटात कंगना राणौतसह सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malika Rajput (@mallikarajput)

मृत अभिनेत्रीची आई सुमित्रा सिंह यांनी सांगितलं, की ‘आम्ही सर्व जण झोपलेलो होतो. आम्हाला या घटनेबद्दल कळलंच नाही. आधी दरवाजा बंद होता. त्यानंतर दरवाजा उघडला होता आणि आतला लाइट सुरू होता. आम्ही खोलीच्या बाजूला तीनदा गेलो; मात्र दरवाजा उघडून पाहिला नाही. शेवटच्या वेळी जेव्हा आम्ही आलो, तेव्हा ती उभी दिसली. नंतर आम्ही दरवाज्यावर धक्के मारले, तेव्हा आमची मुलगी लटकत असलेली दिसली. माझे पती आणि मुलांना बोलावेपर्यंत उशीर झाला होता. तिच्या बाबतीत असं काहीही घडलं नव्हतं, की ज्यामुळे असं काही घडू शकेल.’

पोलीस स्टेशनचे प्रभारी श्रीराम पाण्डेय यांनी सांगितलं, की प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचं दिसत आहे. पोस्ट-मॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. त्यानंतरच योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. आत्महत्या आहे की हत्या हे निश्चित होण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जात आहे. ते निश्चित झाल्याशिवाय तपासाला दिशा मिळणार नाही.