प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना चेन्नई न्यायालयाने एका प्रकरणात 6 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने त्यांना 5 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणात अभिनेत्रीसह तिचे व्यावसायिक भागीदार राम कुमार आणि राजा बाबू यांनाही दोषी ठरवण्यात आले आहे.
वृत्तानुसार, अभिनेत्री जया प्रदा आणि तिच्या व्यावसायिक भागीदारांचे चेन्नईमध्ये एक चित्रपटगृह होते. मात्र तोट्यात गेल्याने तो काही वर्षांपूर्वी बंद झाला होता. यानंतर थिएटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जयाप्रदा यांच्या पगारातून कापलेली ईएसआय रक्कम न भरल्याबद्दल गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणी चेन्नईच्या एग्मोर मॅजिस्ट्रेट कोर्टाने जया प्रदा, राम कुमार आणि राजा बाबू यांना तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.
!! BJP MEMBER JAILED !!
She is JAYA PRADA, Member of BJP
She owned a Movie Theatre in Chennai few years ago.
Theater workers who worked for her were unhappy & angry on her,
Because she did repay the ESI Amount that was deducted from their salaries.
So, Theatre workers… pic.twitter.com/bdGCfjmUvV
— The NCR Adda (@TheNcrAdda) August 11, 2023
जयाप्रदा यांनी हे प्रकरण स्वीकारले आहे आणि थिएटर कामगारांना सर्व थकबाकी देण्याचे आश्वासन दिले आहे. हा खटला फेटाळण्याची विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून लावत त्यांना 5 हजार रुपयांच्या दंडासह 6 महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
जया प्रदा या दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. एकेकाळी प्रेक्षक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या, जया प्रदा चित्रपट जगतापासून दूर राजकारणात सक्रिय आहेत आणि सध्या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सदस्य आहेत.