
पुणे : गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केली आहे. नोकरी लागत नसल्यामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलले, तसं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये त्याने नमूद केलं आहे. अक्षय माटेगावकर असं त्याचं नाव होतं. वयाच्या 21व्या वर्षी त्याने सुसगाव येथील इमारतीच्या आठव्या मजल्यावरून त्याने उडी घेतली.
अक्षयने नुकतीच एका आयटी कंपनीमध्ये इंटर्नशिप केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्ज देखील केले होते. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती. आता नोकरी भेटणार नाही, या भीतीनं त्याने हे टोकाचे पाऊल उचललं. तत्पूर्वी एक चिट्ठी त्याने लिहून ठेवली.
अक्षयची आई मीनल माटेगावकर या मुंबईमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, वडील अमोल माटेगावकर हे नामांकित कंपनीमध्ये काम करतात. या घटनेमुळे माटेगावकर कुंटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.