लाइव्ह शोदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, पहा व्हिडिओ

रविवारी युक्रेनच्या हल्ल्यात एका रशियन अभिनेत्रीचा मृत्यू झाला आहे. ज्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

WhatsApp Group

रशिया आणि युक्रेनमध्ये अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, परंतु ताज्या घडामोडी हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत. लाइव्ह शोदरम्यान युक्रेनमधून झालेल्या हल्ल्यात एका रशियन अभिनेत्रीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पोलिना मेनशिख अशी ओळख असलेली रशियन अभिनेत्री परफॉर्म करत होती.

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या रविवारी घडली. जेव्हा रशियाच्या क्षेपणास्त्र दल आणि तोफखान्याच्या वार्षिक दिनानिमित्त मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याच वेळी, अभिनेत्रीसह काही नाविकांचा देखील युक्रेनच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. यासोबतच कॉन्सर्ट हॉलमध्ये झालेल्या या हल्ल्यात जवळपास 100 लोक जखमी झाले आहेत. मात्र, या हल्ल्यात एकूण किती लोक मारले गेले याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

वायरक क्लिपमध्ये अभिनेत्री परफॉर्म करताना दिसत आहे: वायरल क्लिपमध्ये, मेनशिखला गिटार वाजवताना आणि रशियन सैनिकांसाठी गाताना पाहिले जाऊ शकते, ज्या दरम्यान अचानक कंपन होते आणि व्हिडिओ ब्लॅक आउट होतो.