‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीला बलात्काराच्या धमक्या

WhatsApp Group

मुंबई – प्रसिद्ध टीव्ही होस्ट, बॉलीवूड अभिनेता आणि माजी बिग बॉस स्पर्धक जय भानुशालीची पत्नी माही विज हिला रस्त्यावर बलात्काराची उघड धमकी (Threat) मिळाली आहे. जयची पत्नी स्वतः एक अभिनेत्री (Actress) आहे, पण लग्नानंतर तिने अभिनय करणे सोडून दिलं आहे, आणि मुलांचे संगोपन सुरू केले. परंतु, ती सोशल मीडियाच्या (Social media) माध्यमातून आपली उपस्थिती नोंदवत असते.

अभिनेत्री माही विजने नुकताच तिच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि हा व्हिडिओ (Video) शेअर करताना अभिनेत्रीने सांगितलं की, एका व्यक्तीने तिला मध्येच थांबवले आणि तिला शिवीगाळच केली, नाहीतर बलात्काराची धमकीही दिली आहे.

तिने या व्हिडिओमध्ये मुंबई (Mumbai) पोलिसांनाही टॅग केले असून स्वत:साठी मदतीची याचना केली आहे. माही विजचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.