प्रसिद्ध अभिनेते दिलीप ताहिल यांना 2 महिन्यांचा तुरुंगवास, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

0
WhatsApp Group

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध कलाकार, दिलीप ताहिल यांनी आपल्या कामाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र दिलीप ताहिल आता अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. दलीप ताहिलला 2 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर, 2018 मध्ये दलीप ताहिल एका ऑटोरिक्षाच्या धडकेमुळे अडचणीत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दलीप ताहिल हे दारूच्या नशेत गाडी चालवत होते. आता पोलिसांनी अभिनेत्याला अटक केली.

दलीप ताहिल यांना खार, मुंबई येथे एका महिलेला जखमी केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले आहे. आता या प्रकरणात कोर्टाने अभिनेत्याला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. बातमीनुसार, दलीप ताहिल यांनी मद्यधुंद अवस्थेत ऑटोरिक्षाला धडक दिली तेव्हा त्या ऑटोमध्ये एक तरुण आणि एक तरुणी उपस्थित होते. जे या धडकेनंतर जखमी झाले.

डॉक्टरांचा अहवाल लक्षात घेऊन न्यायालयाने हा निकाल दिला आहे. एका अहवालानुसार, डॉक्टरांच्या अहवालात दारूचा वास आढळला होता. त्या काळात दलीप यांना स्वतःला नीट चालताही येत नव्हते. त्याच्याशी नीट बोलताही येत नव्हते. या सर्व गोष्टींचा विचार करून न्यायालयाने कलाकाराला 2 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.