सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचे प्लेन क्रॅशमध्ये 2 मुलींसह निधन

0
WhatsApp Group

Christian Oliver killed in plane crash: अमेरिकन अभिनेता क्रिश्चियन ऑलिव्हरचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात ख्रिस्तियन याच्या 10 आणि 12 वर्षांच्या मदिता आणि अॅनिक या दोन मुलींनाही आपला जीव गमवावा लागला.

क्रिश्चियन ऑलिव्हरला क्रिश्चियन क्लेपसर म्हणूनही ओळखले जाते. अभिनेता ज्या विमानात प्रवास करत होता ते विमान बेकिया या कॅरेबियन बेटावर कोसळले. ख्रिस्तियन याच्या निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by tt_nbn (@ttnbn2)

त्याने एफ मिशेल विमानतळावरून सेंट लुसियाच्या मार्गावर उड्डाण केले आणि टेक ऑफ करताच विमानात काहीतरी बिघाड झाला. मात्र, विमान पुढे गेले आणि काही अंतरावर गेल्यावर (बेकियाजवळील कॅरिबियनमध्ये) ते कोसळले आणि पाण्यात पडले. यावेळी उपस्थित लोकांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र कोणालाही वाचवता आले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Koimoi.com (@koimoi)

क्रिश्चियन ऑलिव्हर फक्त 51 वर्षांचा होता आणि तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जात होता. क्रिश्चियन ऑलिव्हरचे स्पीड रेसर आणि वाल्कीरी सारखे प्रसिद्ध चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. अलीकडेच क्रिश्चियन ऑलिव्हरने इंडियाना जोन्स या चित्रपटात प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे.