खोटले नवनिर्वाचित सरपंच, सर्व सदस्य यांनी ग्रामस्थांसहित घेतली आमदार वैभव नाईक यांची भेट

WhatsApp Group

मालवण: मालवण तालुक्यातील खोटले गावच्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातर्फे बहुमताने निवडून आलेले सरपंच सुशील बळीराम परब यांनी कणकवली विजय भवन येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांची भेट घेतली. आमदार वैभव नाईक यांनी त्यांचे स्वागत केले व खोटले गावच्या विकासासाठी भविष्यामध्ये निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे यावेळी खोटले ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

यावेळी सोबत नवनिर्वाचित सर्व सदस्य, आशिष परब, महेश घाडगावकर,बाळा परब,महेश चव्हाण, अमोल परब, विजय साळकर, नाना शिंदे, अजित कदम, अरुण घाडीगावकर, विलास घाडीगावकर आदी खोटले ग्रामस्थ उपस्थित होते.

Inside मराठीचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा