फेसबुकने गमावले 10 लाख डेली युजर्स, कंपनीचे शेअर्सही 22 टक्यांनी घसरले

WhatsApp Group

वॉशिंग्टन – जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया कंपनी असलेल्या फेसबुकला सध्या कमी युजर्समुळे तोटा सहन करावा लागत आहे. फेसबुकची मालकी कंपनी असलेल्या मेटाने युजर्सची संख्या कमी झाल्यामुळे त्यांच्या नफ्यावर परिणाम झाल्याचे सांगितले आहे.

याचा थेट परिणाम कंपनीकडून मिळणाऱ्या जाहिरातींवरही होणार आहे. तसेच कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीतही 22 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मेटा कंपनीला गेल्या वर्षीच्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा झाला होता. मात्र असे असूनही डेली युजर्सची संख्या वाढली नसल्याने कंपनीची चिंता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीने आपल्या नावात बदल केल्यानंतरचा हा पहिलाच निकाल आहे.

2021 च्या शेवटच्या 2 तिमाहीत फेसबुक अॅपने जवळपास १० लाख डेली युजर्स वापरकर्ते गमावले आहे. सध्या फेसबुककडे 2 अब्ज डेली युजर्स आहेत. कंपनीच्या एका वित्तीय अधिकाऱ्याने सांगितले की, आशिया-पॅसिफिक प्रदेशातील वाढते कोरोना संकट आणि भारतातील मोबाइल डेटा प्लॅन्सच्या वाढलेल्या किमतीमुळे हा तोटा झाला आहे.