मोठी बातमी, फेसबुकने बदललं आपलं नाव!

WhatsApp Group

नवी दिल्ली – फेसबुकनं जाहीर केलं आहे की त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून ‘मेटा’ (Meta) असं केलं आहे. नवीन नाव हे सोशल नेटवर्किंगचं भविष्य असेल असं फेसबुकने म्हटलंय (Facebook company’s new name).

कंपनीचे मुख्य कार्यकारी मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. फेसबुक अ‍ॅप हे त्याच नावाने ओळखले जाईल. तर व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम यांसारख्या इतर सर्व ठिकाणांहून फेसबुकची ब्रँडिंग काढून टाकली जाईल. ही सर्व अ‍ॅप्स आता फेसबुकऐवजी ‘मेटा’ ब्रँड अंतर्गत राहतील, तर फेसबुक हे त्या विविध अ‍ॅप्सपैकी एक असेल.


झुकरबर्ग यांनी रिब्रँडसाठी त्यांचे कारण स्पष्ट करणारे एक पत्र प्रकाशित केले आणि त्यांनी नमूद केले आहे की ते कंपनीचे सीईओ पद सोडणार नाहीत.

यापूर्वीही 2005 मध्ये कंपनीने फेसबुकचं नाव बदलले होते. तेव्हा ‘theFacebook’ वरून फक्त ‘Facebook’ असं नामकरण करण्यात आलं होतं.

गेल्या महिन्यात फेसबुकने मेटाव्हर्स तयार करण्याच्या आपल्या योजनेची माहिती दिली होती. मेटाव्हर्स हा शब्द डिजिटल जगात आभासी, परस्परसंवादी जागा जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी वापरला जातो. मेटाव्‍हर्स हे एक आभासी जग आहे जिथं एखादी व्‍यक्‍ती शारीरिकदृष्ट्या हजर नसली तरीही तीचं अस्‍तित्‍व असणार आहे.

याआधी फेसबुकने जाहीर केले होते की सोशल नेटवर्क मेटाव्हर्स करण्यासाठी हजारो कर्मचाऱ्यांची आवश्यकता असेल. यासाठी 10,000 लोकांना कामावर ठेवण्याची घोषणा फेसबुककडून करण्यात आली होती. नवीन मेटाव्हर्समध्ये, फेसबुक आभासी आणि संवर्धित वास्तवाचा वापर करेल आणि आभासी अनुभवांचा एक नवीन अध्याय सुरू करेल.