पोलीस भरतीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करता येईल अर्ज

WhatsApp Group

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी बातमी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “पोलीस भरतीच्या संदर्भात आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आलेले आहेत. तथापि काही ठिकाणांहून ही तक्रार येते आहे की, तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत.

9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. तर आज म्हणजेच 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवून 15 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयानं ट्विट करत दिली आहे.

 

Join our WhatsApp Group, Instagram, Facebook Page and Twitter for every update