पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढच्या वर्षापर्यंत वाढवली, पण ‘मोफत सेवा’ आता संपली!

WhatsApp Group

पॅन-आधार लिंकची शेवटची तारीख पुढच्या वर्षापर्यंत वाढवली आहे.सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT), आयकर विभागाची सर्वोच्च धोरण बनवणारी संस्थाने पूर्ण वर्षासाठी पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. मात्र आता पॅन-आधार लिंकची ही सेवा ‘फुकट’ मिळणार नाही.

सीबीडीटीने बुधवारी संध्याकाळी उशिरा याबाबत अधिसूचना जारी केली. नोटिफिकेशनमध्ये असे लिहिले आहे की, करदात्यांची गैरसोय कमी करण्यासाठी आधार कार्डसोबत पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारने पॅनला आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख चौथ्यांदा वाढवली आहे.

आतापर्यंत या कामासाठी करदात्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नव्हते. मात्र आता ही ‘मोफत सेवा’ बंद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, जर करदात्याने 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान पॅन-आधार लिंक केले तर त्याला 500 रुपये आणि त्यानंतर 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.