भागलपूरमध्ये तीन मजली इमारतीत स्फोट, ७ जण ठार

WhatsApp Group

बिहारमधील भागलपूरमध्ये गुरुवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. येथील एका इमारतीत स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की तीन मजली घर जमीनदोस्त झाले. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. घरात बॉम्ब बनवल्याचा आरोप शेजाऱ्यांनी केला आहे.

भागलपूर जिल्ह्यातील तातारपूर पोलीस स्टेशन परिसरात हा स्फोट झाला. या घटनेत २-३ घरांचे नुकसान झाले आहे. ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत कोतवालीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर होती. बॉम्बस्फोटामुळे हा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या स्फोटात तीन मजली इमारत कोसळली.

या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. भागलपूरचे डीआयजी सुजित कुमार म्हणाले, “प्राथमिक तपासात बारूद आणि बेकायदेशीर फटाके आणि देशी बनावटीच्या बॉम्बने स्फोट झाल्याची चर्चा आहे. ते म्हणाले, एफएसएल टीमच्या तपासानंतर हा स्फोट कशामुळे झाला हे ठरवले जाईल.

भागलपूरच्या माजी उपमहापौर प्रति शेखर म्हणाल्या, भागलपूरमध्ये बॉम्बस्फोटाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस आणि एफएसएल पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत.