
वाहन चालवताना नियम मोडला की वाहतुक पोलीस (Pune Traffic Police) लगेच दंड ठोठावतात. त्यामुळे ट्रॅफीक पोलीस (Traffic Police) काकांशी थोडं सांभाळूनच राहावं लागतं. कधीमधी वाहतूक पोलीस आणि वाहनचालक यांच्यात वादावादीही होते. यावर पुणे पोलिसांनी नामी उपाय शोधला पुणे वाहतुक पोलीस आता थेट दंड आकारणार नाहीत. पुणेकरांना (Punekars ) आता सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे जर सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्याच्या नजरेत तुमची चुक पकडली गेली. तर तुम्हाला थेट ऑनलाईन दंडच ( E- Payment) भरावा लागणार आहे.