VIDEO: ‘मी एक दिवस कपडे घालणार नाही…’, Urfi Javedच्या वक्तव्याने खळबळ

WhatsApp Group

बिग बॉसच्या घरातून प्रकाश झोतात आलेली उर्फी जावेद (Urfi Javed) ही सोशल मीडिया सेन्सेशन आहे. आपल्या स्टाईल आणि कपड्यांमुळे बर्‍याचदा प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या उर्फीला मोकळेपणाने कसे बोलावे हे देखील माहित आहे. सध्या चित्रपट, मालिका, वेब सिरीज आणि मोठमोठे म्युझिक व्हिडिओ यापासून दूर असले तरी उर्फी आजही रोजच चर्चेत असते. बोल्ड ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत येणारी उर्फी यावेळी मात्र तिच्या बोल्ड वक्तव्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

उर्फीने नुकतंच मुसळधार पावसात बोल्ड शूट केलं. त्यावेळेस माध्यमांशी बोलत असताना तिने एक वक्तव्य केलं आणि ते ऐकून तिच्यावर टीका करणाऱ्यांनाही समजलं असेल की, ती आता त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून बिनधास्तपणे जगायला शिकली आहे. माध्यमांशी बोलत असताना उर्फी म्हणाली, एक दिवस मी कपडेच घालणार नाही म्हणजे चर्चेला विषयच नको. उर्फीच्या या बोल्ड वक्तव्यामुळे सगळीकडे चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by POP Diaries (@ipopdiaries)

दरम्यान, माझ्याकडे लोकांनी आश्चर्यचकित होऊन बघावे यासाठी मी ड्रेसिंग करत नाही. तर मला जसे कपडे आवडतात तसेच मी घालत असते, असं स्पष्टीकरण देखील उर्फीने दिलं आहे. तर मला कोणी ट्रोल केलं तरी मला काहीच फरक पडत नाही, असंही उर्फी यावेळी बोलताना म्हणाली आहे.