आज आम्ही येथे मराठी सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत. सुविचार मराठी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता. येथे आम्ही मराठी सुविचार लिहिले आहेत, जे तुम्ही दररोज वाचू शकता आणि सकारात्मक विचाराने तुमचा दिवस सुरू करू शकता. चला तर मग चांगले Marathi Suvichar वाचूया.
- हृदयात दोनच शब्द असतात ते म्हणजे आई.
- तारुण्याचा काळ हा पुढील जीवनाचा मार्गदर्शक असतो.
- संस्कार आणि विकास जो साधतो तो मनुष्य व जो साधत नाही तो पशु होय!
- अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.
- आपली स्तुती आपण करू नये. ना ती इतरांना करू द्यावी.
- जीवन हे सुख व दुःख यांचा संगम होय.
- सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो.
सुविचार हे मानवांना प्रेरणा देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम बनतात आणि विश्वास प्रदान करतात. भगवतगीता मध्ये देखील उपदेश केला आहे की, एखादी व्यक्ती काम करत असतानाच कर्म सर्वश्रेष्ठ होते, त्या कर्माचे फळं त्याला मिळते. ज्यांना यश मिळवायचे आहे, ते लहानश्या संकटांची आणि अपयशाची भीती कधीच बाळगत नाही.
- भीड ही भिकेची बहिण आहे.
- स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते.
- श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
- शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.
- सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
- ग्रंथ हेच आपले गुरु.
- पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
ज्याच्या जवळ सुंदर विचार सुविचार आहेत.तो कधीही एकटा नसतो.आज आपण असेच काही सुंदर विचार वाचणार आहेत.
- खरा मित्र आपली पुस्तके होय.
- पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.
- सत्य हेच अंतिम समाधान असते.
- कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज.
- पापी मनुष्याला सत्य हे सापासारखे दंश करत असते.
- तुम्हाला कोणाचा मान करायचा नसेल तर करू नका. पण त्याचा अपमानही करू नका.
- दानापेक्षाही त्यागाने माणूस मोठा होतो.
ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.
- आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवावलाच हवी.
- एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईट तरी चिंतू नका.
- निसर्गाच्या पुढे प्रगतशिल माणूस खुजाच असतो.
- खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही.
- सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
- पैशाने सर्वकाही घेता येते पण प्रेम पैशाने घेता येत नाही.
- पैशाने माणूस पशू बनतो.