
माणसाचे विचार ही त्याची आयुष्याची पुंजी आहे. ज्या माणसाचा विचार भक्कम नाही त्याला आयुष्यात काहीच करता येत नाही. आपण अगदी शाळेपासूनच मराठी सुविचार शिकत असतो आणि ते आचरणात आणत असतो.
क्र. | सुविचार मराठी |
---|---|
1 | टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कारण असे मित्रच जास्त विश्वासघात करतात |
2 | कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही |
3 | भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो |
4 | विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात |
5 | आपली स्तुती आपण करू नये. ना ती इतरांना करू द्यावी. |
6 | कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा, खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवायची हिंमत कायम मनगटात ठेवा |
7 | विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो |
8 | संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात कायम असतं |
9 | टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कारण असे मित्रच जास्त विश्वासघात करतात |
10 | थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायलाॉ काय हरकत आहे |
सुंदर सुविचार आयुष्यात आपल्याला योग्य मार्गावर जगण्यासाठी बळ देत असतात. एक यशस्वी माणूस म्हणून जगताना मुळात शिकवणीचा पाया हा सुविचाराने रचलेला असतो हे विसरता येत नाही.
11 | खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील? |
12 | मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात |
13 | कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका |
14 | जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा |
15 | खरा मित्र आपली पुस्तके होय. |
16 | जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण |
17 | सत्य हेच अंतिम समाधान असते. |
18 | जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा |
19 | ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं |
20 | खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो |
तुम्हाला लहानपणापासून मनावर जे संस्कार देण्यात येतात त्याचप्रमाणे तुम्ही घडत असता. इतकंच नाही तर तुमच्यावर येणारी परिस्थिती काय आहे यानुसार तुम्ही वागता. तुमच्या मनात सुविचार पक्के रूतलेले असतील तर तुम्ही कधीच चुकीचा मार्ग निवडणार नाही याची तुमच्या आई-वडिलांनाही खात्री असते. शिकवण आचरणात आणावी यासाठीच काही सुविचार असतात.
21 | मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात |
22 | कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका |
23 | जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा |
24 | जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण |
25 | जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा |
26 | ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं |
27 | खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो |
28 | स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात |
29 | जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा. चुकाल तेव्हा माफी मागा, अन कुणी चुकलं तर माफ करा |
30 | आपण पाहत असलेली आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात |
कधी कधी आपण उदास होतो आणि अशा वेळी प्रेरणेची आणि उत्साह देण्याची गरज असते. अशावेळी मराठी सुविचार वाचल्याने बळ मिळते.
31 | कोणतेही उद्दिष्ट मेहनती शिवाय साध्य होत नसते. |
32 | कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी संयम राखणे हेच शौर्याचे लक्षण आहे. |
33 | गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही. |
34 | गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं. |
35 | मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ. |
36 | काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच. |
37 | माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं. |
38 | माणसाचं छोटे दु:ख हे जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं की त्याला खरोखरीच सुखाची चव येते. |
39 | मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो. |
40 | डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही, भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. |