Marathi Suvichar | उत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

WhatsApp Group

आज आम्ही येथे मराठी सुविचार संग्रह घेऊन आलो आहोत. सुविचार मराठी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता. येथे आम्ही मराठी सुविचार लिहिले आहेत, जे तुम्ही दररोज वाचू शकता आणि सकारात्मक विचाराने तुमचा दिवस सुरू करू शकता. 

1 सद्गुण, सदाचार, सत्कार्य आणि सेवाभाव ही माणसाच्या जीवनाची चतुःसुत्री आहे.
2 कुठलाही मनुष्य जात्या वाईट नसतो वाईट असते त्याची वृत्ती.
3 जीवनात विचाराने वागल्यास पश्चातापाच्या आगीत जळावे लागत नाही.
4 मोठ्या झाडाखाली लहान झाडे वाढत नाहीत.
5 दाता कर्णासारखा असावा, भ्राता श्रीकृष्णासारखा असावा.
6 कुठल्याही गोष्टीचा परामर्श हा बघावाच लागतो.
7 फुटलेले मणी आणि तुटलेले मन सांधता येत नाही.
8 वादळे झाली तरी सागर कधी आटत नाही.
9 झटपट परिचय अंगाशी येण्याचा संभव जास्त.
10 काम करायचे नसेल तर मोठ्या अटी घातल्या जाता

चांगले सुविचार वाचल्याने आपल्याला अवघड वाटणारे प्रत्येक काम सोपे होते, आत्मविश्वास वाढतो. 

11 गवतापेक्षा कापूस हलका, कापसापेक्षाही याचक हलका पण वारा त्याला उडवून नेत नाही कारण वायाला भिती वाटते की याचक आपल्याकडे काही दान मागेल का?
12 वेष असावा बावळा परी अंतरी असाव्या नाना कळा.
13 भुंकणाऱ्या कुत्र्याला जर पोळीचा तुकडा टाकला तर तो गप्प बसतो तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी विरोध करणाऱ्याला काही देऊन आपले काम साधावे.
14 ज्या ठिकाणी ज्ञानी माणूस नसतो त्या ठिकाणी कमी शिकलेला माणूस ज्ञानी असतो.
15 काव्याचा आनंद हा अमृताप्रमाणे असतो.
16 पावसाला सुरुवात झाली की कोकीळा गात नाहीत तर बेडूक डराव डराव करतात. त्याचप्रमाणे ज्ञानी माणसांनी अज्ञानी माणसांसमोर गप्प रहाणे हे श्रेयस्कर असते.
17 असंतोष हेच वैभवाचे प्रतिक आहे.
18 कर्म हे च मनुष्याच्या बरोबर जात असते तेव्हा त्यानी ठरविले पाहिजे आपण चांगले कर्म करावे की कुकर्म करावे.
19 ईश्वर हा एकच असून देव ही त्याची अनेक रूपे आहेत.
20 प्रेमाचा ओलावा दुःखी हृदयाच्या माणसाला धन संपत्तीपेक्षा जास्त असतो.

जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात कोणतीही अडचण येते तेव्हा सुविचारांनी तुम्ही योग्य दिशेने विचार करू शकता. जेणेकरून जेव्हाही कोणतीही अडचण येते तेव्हा तुम्ही त्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकता आणि त्यावर उपाय शोधू शकता.

21 सौंदर्याची स्तुती करणे हा आपण त्या व्यक्तिला दिलेला मानच होय.
22 पराभवाने खचून न जाता पुन्हा त्याच धैर्याने उभे रहाणारा खरे जीवन जगू शकतो.
23 वृक्ष हे तुमच्या माता पित्या समान असतात.
24 वृक्षाने निसर्गाचा समतोल राहातो.
25 काम, क्रोध, मत्सर, मोह हे माणसाचे शत्रू आहेत.
26 सत्याचा मार्ग सुख समाधानाच्या वाटेने जातो.
27 कोणचाही आदर्श ठेवताना तो आदर्श आहे की नाही हे पडताळून पाहा.
28 सूर्याकडे पाहा ज्याप्रमाणे तो निर्मल व तेजस्वी असतो. त्याचप्रमाणे सज्जन माणूस अंर्तबाह्य असतो.
29 तुम्हाला राग आला तर दहा अंक मोजा.
30 राक्षसासारखी ताकद कधीही चांगलीच पण राक्षसी लालसा असू नये.

 

सुविचाराने तुम्हीही तुमचं आयुष्य समृद्ध करा. रोज सकाळी काम सुरू करण्यापूर्वी तुम्ही अशाच सुविचाराचा विचार करून आपला दिवस अधिक चांगला करा. 

31 सरोवरात अनेक बदके पोहताना दिसतात. पण हंस मात्र एकच असतो.
32 कळसाने पायाच्या दगडाला विसरू नये आणि दगडाने वरती कळसापर्यंत पोहचण्याची अपेक्षा करू नये.
33 सत्तालालसेपायी माणूस आपल्या स्वतःला अनेक शत्रू निर्माण करतो.
34 दुसऱ्याच्या अनुभवाने शहाणे होणे हे पण शहाणपणाचे असते.
35 जगात चिरंजीव कोणीच नाही, शिवाय सप्तचिरंजीव मारुती, अश्वत्थामा, बिभिषण, परशुराम, कृपाचार्य, कार्तिकेय.
36 आपण उच्चकुळीचा आणि दुसरा नीच कुळीचा अशा दृष्टीने राहू व वागू नये.
37 घेतलेल्या विद्येचा योग्य वापर करा. मग तुमची ती विद्या विधायक असो अथवा विघातक.
38 ज्ञानाने माणसाची विद्वत्ता वाढते पण सदाचार वाढतोच असे नाही. 168. सुविद्य माणसाच्या मनात नेहमी सुविचारच असतात.
39 मुलांनो सुविचार आचरणात आणा, केवळ वाचनासाठी पुस्तक संग्रह करू नका.
40 अविरत परिश्रम करून मिळणाऱ्या यशाचा अमृत कुंभ हातात घेण्यापूर्वी हलाहल पचवावे लागते.