परीक्षा ऑफलाइनच होणार! महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

WhatsApp Group

सोलापूर – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या गेल्या. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने दिवाळीनंतर महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग एकमेकांच्या संपर्कातून वाढणार नाही याची दक्षता टास्क फोर्सकडून घेतली जात आहे

दिवाळीनंतर महाविद्यालये ऑफलाइन पद्धतीने सुरू होतील. मात्र सर्व विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे लसीकरण व्हावे यासाठी महाविद्यालयांमधे लसीकरणाचे कॅम्पदेखील ठेवण्यात आले आहेत. तरीदेखील लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लस न घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता येणार नाही. असा निर्णय होण्याची शक्यता आहे अशी माहिती उच्च शिक्षण विभागातील सूत्रांकडून देण्यात आली आहे.

महाविद्यालये 20 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली. मात्र, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे विद्यार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन्ही डोस घेणे गरजेचे आहेत. कोविशिल्ड किंवा कोवॅक्‍सिन यापैकी कोणत्याही एका लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे.