पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रे वाढवण्यात आली आहेत. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिला पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाकडून देण्यात आली आहे.
शाखानिहाय विद्यार्थी
- विज्ञान – ६ लाख ३२,९९४
- कला – ४ लाख ३७,३३६
- वाणिज्य – ३ लाख ६४,३६२
- व्यावसायिक अभ्यासक्रम – ५० हजार २०२
- तंत्रशास्त्र – ९३२
एकूण परीक्षा केंद्रे – ९ हजार ६३५ (२ हजार ९९६ मुख्य केंद्रे आणि ६ हजार ६३९ उपकेंद्रे)
परीक्षा अर्ज भरलेले विद्यार्थी – १४ लाख ८५ हजार ८२६ (८ लाख १७ हजार ६११ विद्यार्थी, ६ लाख ६८ हजार ८८ विद्यार्थिनी)
- तांत्रिक कारणामुळे ५ आणि ७ मार्चला होणारी परीक्षा अनुक्रमे ५ एप्रिल आणि ७ एप्रिलला ७० ते १०० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे जादा वेळ राहील
- ४० ते ६० गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे जादा वेळ राहील
- परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, महिलांची विशेष पथके स्थापन, परीक्षा केंद्रांचे चित्रीकरण
- विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान तणावाबाबत मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती