एकनाथ शिंदेंसोबत नेमके किती आमदार? वाचा सविस्तर

WhatsApp Group

मुंबई – शिवसेनेतील (ShivSena) आमदारांच्या बंडामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केले आहे. शिंदे गटात जाणाऱ्या आमदारांची संख्या वाढतच जात आहे. काल शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही एकनाथ शिंदे गटात गेले. शिंदे गटात सध्या ४७ आमदार गेले असल्याचे बोलले जात आहे. यात शिवसेनेचे (ShivSena) ३८ आणि अपक्ष ९ आमदार आहेत. यामुळे आता राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अडचणीत आले आहे.

शिवसेनेतील आमदार

एकनाथ शिंदे, अनिल बाबर, शंभूराजे देसाई, महेश शिंदे, शहाजी पाटील, महेंद्र थोरवे, भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी, प्रकाश अबिटकर, डॉ. बालाजी किणीकर, ज्ञानराज चौगुले, प्रा. रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार नबी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजय रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वनगा, किशोरअप्पा पाटील, सुहास कांदे, चिमणआबा पाटील, सौ. लता सोनावणे, प्रताप सरनाईक, सौ. यामिनी जाधव, योगेश कदम, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, दीपक केसरकर, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत शिवसेनेच्या एकुण ३८ आमदारांनी बंडखोरी केली आहे. हे सर्व आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

अपक्ष आमदार कोण आहेत?

बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र यड्रावकर, चंद्रकांत पाटील, नरेंद्र भोंडेकर, किशोर जोरगेवार, सौ.मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, सौ. गीता जैन अपक्ष ९ आमदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला ४७ आमदारांनी पाठिंबा दिल्यामुळे आता महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. महाविकास आघाडी सरकारमधील ८ कॅबिनेट मंत्र्यांचा यात समावेश आहे.