Car Accident : माजी भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! कंटेनरने मारली धडक

WhatsApp Group

Praveen Kumar Car Accident: भारतीय संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार याचा मेरठ शहरात कारमधून जात असताना मंगळवारी उशिरा अपघात झाला. त्यांच्या कारला भरधाव वेगाने येणाऱ्या कॅंटरने धडक दिली. त्यावेळी प्रवीणसोबत त्यांचा मुलगाही कारमध्ये होता आणि दोघेही या अपघातातून थोडक्यात बचावले. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी कॅंटर चालकाला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

प्रवीण कुमार 4 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मेरठमधील पांडव नगर येथून त्याच्या लँड रोव्हर डिफेंडर वाहनाने येत होतय. यानंतर हे वाहन आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ पोहोचले असता त्याचवेळी त्याच्या वाहनाची कॅंटरला धडक बसली. वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघातात प्रवीण आणि त्याचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे.

अपघातानंतर सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून कॅन्टर चालकाला ताब्यात घेतले. या अपघाताबाबत सीओने सांगितले की, प्रवीण कुमार आणि मुलगा पूर्णपणे सुरक्षित आहेत. प्रवीण कुमार यांचे घर मेरठ शहरातील बागपत रोडवर असलेल्या मुलतान नगरमध्ये आहे.

प्रवीण कुमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, एकेकाळी तो टीम इंडियासाठी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये मुख्य गोलंदाजाची भूमिका बजावत असे. 2008 साली जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सीबी मालिका जिंकली तेव्हा त्यातही प्रवीण कुमारने चेंडूने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवीण कुमारला भारतीय संघाकडून 68 एकदिवसीय, 10 टी-20 आणि 6 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये प्रवीणने वनडेमध्ये 77, टी-20 मध्ये ८ आणि कसोटीत 27 बळी घेतले आहेत. याशिवाय 119 आयपीएल सामन्यांमध्ये प्रवीण कुमारच्या नावावर 90 बळींची नोंद आहे.